वाई तालुक्‍यातील 39 गावे टंचाईग्रस्त

तहसिलदारांनी केली घोषणा, फेब्रुवारीपासून दुष्काळाची दाहकता वाढली

भुईंज – वाई तालुक्‍यात दरवर्षी पाणी टंचाई भासणाऱ्या गावागावातील ग्रामपंचायतींनी पाणी टॅंकर मागणीचे ग्रामसभांचे ठरावांचे प्रस्ताव तयार करुन वाईच्या तहसिलदारांकडे पाठवले होते. त्यापैकी त्यांनी 39 गावांमध्ये पाणी टंचाई भासणार असल्याचे घोषीत केल्याने ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती तहसीलदार रमेश शेडगे यांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वाई तालुक्‍याच्या उत्तर आणि पूर्व भागातील 40 गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागातील पिण्याच्या आणी शेतीच्या विहिरीतील पाणी पातळी नोहेंबर डिसेंबर महिन्यापासूनच हळुहळु खोल खोल जाताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वरील भागातील गावांमध्ये ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रांच्या हंगामांना सुरुवात होणार आहे.

नोकरी निमित्त परगावी असलेले चाकरमानी हळुहळु आपआपल्या गावांकडे परतू लागले आहेत. पण गावाकडे आल्यावर त्यांना पाणी टंचाईसारख्या संकटांना सामोरे जावे लागते पाण्याची गरज भागवण्यासाठी जादा दराने पाणी विकत घेऊन यात्रा साजऱ्या कराव्या लागत असल्यामुळे नाराजी पसरली आहे. पिढ्यान्‌पिढ्या पाणी टंचाईच्या संकटात सापडणाऱ्या गावांना शासनामार्फत टॅंकरने पाणी पुरवठा करुन तात पुरती माणसांसह जणावरांची तहान भागवण्यासाठी शासनाचे लाखो रुपयांचा फुकट खर्च होतो त्यापेक्षा शासनाने कायम स्वरूपांच्या पाण्याच्या उपाय योजना करुन शेतकरी आणि गावांना दिलासा दिल्यास शेतकऱ्यांना नवनवीन स्पर्धात्मक पिके घेऊन गावांची प्रगतीकडे वाटचाल नक्कीच करता येईल आणि पाणी टंचाई भासणाऱ्या प्रत्येक गावांमधील उच्च सुशिक्षित तरुण हा नोकरीच्या मागे न धावता तो शेतीचे नवनवे प्रयोग करुन स्वत:सह कुटुंबाला प्रगतीचा मार्ग दाखवेल यात बाकी शंका नाही.

शासन बाकी दरवर्षी उन्हाळा सुरु जाहला की पाणी टंचाईची गावे घोषित करते वाई तालुक्‍यात धोमचे 13 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले धरण आहे. त्याला उजवे आणि डावे असे दोन स्वतत्र कालव्यातून शेकडो किलोमीटर पाणी सोडून कोरेगाव आणि सातारा तालुक्‍यातील शेतीला बारमाही पाणी पुरविले जाते पण 1972 साली वाई तालुक्‍यात असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे धरणापासून अवघ्या 10 ते 12 किलो मीटर अंतरावर असणाऱ्या गावांना जाणीव पूर्वक बारमाही पाणी मिळू नये अशी काळजी घेण्यात आली, जर धरणाचा डावा कालवा उत्तरेच्या डोंगराच्या बाजुने काढला असता तर वाई तालुक्‍यातील इंच ना इंच जमीन आज बारमाही पाण्याखाली आली असती पण तसे न झाल्याने आज 40 गावे पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळाच्या झळा सहन करत हजारो कुटुंबाला पोटाची खळगी भरण्यासाठी परगावी स्थलांतरीत व्हावे लागले.

गेल्या 15 वर्षातील वाई तालुक्‍यातील लोक प्रतिनिधींनी आमदारकी आणि खासदारकीची तिकीटे मिळविण्यासाठी शासनाचे करोडो रुपये खर्ची घालुन धोम धरणावर धरण बलकवडीचे धरण बांधून आडवे येणारे डोंगरांना बोगदे पाडून लोक प्रतिनिधींच्या साक्षीने खंडाळा आणि फलटण तालुक्‍यात पाणी पळविले गेले पण आमच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना वाई तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त गावांना बारमाही पाणी देण्याची भावना निर्माण झाली नाही अशी खंत दुष्काळग्रस्त गावांमधून व्यक्त होतांना दिसत आहे.

टंचाईग्रस्त गावे

भिवडी पुर्न., सुरुर, राउतवाडी, खोलवडी, गुडेवाडी (पिराचीवाडी), बालेघर, बलकवडी, चिखली, ओहळी, कुसगांव (विठ्ठलवाडी), गाढवेवाडी, वयगांव, दह्याट, गुळूंब, वाशिवली, मुगांव (न्हाळेवाडी), देगांव, मांढरदेव, भुईंज, परखंदी, वेळे, लगडवाडी, सुलताणपूर, मुंगसेवाडी, वेरुळी (डुईचीवाडी), बोरगांव (बुद्र), बोरगांव (खुर्द), निकमवाडी, चांदवडी पुर्नवसन, वहागांव, मोहडेकरवाडी, शिरगांव, कवठे, बेलमाची, बोपर्डी, चांदक, आनंदपूर, धावडी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)