पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरामधून गेल्या दोन महिन्यांमध्ये एकूण 39 तृतीय पंथीयांना समाज कल्याण विभागाच्या वतीने ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर पिंपरी महापालिका प्रशासन तृतीयपंथींयांना रोजगार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
शहराच्या एकूण 27 लाख लोकसंख्येमागे किमान पाच ते साडेपाच हजार तृतीयपंथीय आहेत.
महापालिका आयुक्तांच्या पिंपरी-चिंचवड आदेशानुसार 30 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय तृतीय पंथीय दिवस साजरा केला. यानंतर तृतीय पंथीयांना महापालिका सेवेत रूजू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुरक्षारक्षक, ग्रीन मार्शल, सफाई कामगार व उद्यान कर्मचारी आदी पदांवर एकूण 27 तृतीय पंथीयांना रोजगार देण्यात आला आहे.
तृतीय पंथीयांना प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रथम तृतीयपंथीयांना वकिलांकडून प्रतिज्ञापत्र बनवून घ्यावे लागते. यानंतर आधार, पॅन कार्ड व प्रतिज्ञापत्र हि तीनही कागद पत्रे एनपीटीपी (नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स) च्या साईडवर अपलोड करावी लागतात. कागद पत्राची छाननी होऊन समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्टिफिकेट देण्यात येतात.