मॉस्को- मध्य रशियाती एका फॅक्टरीमध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटामध्ये किमान 38 जण जखमी झाले. मॉस्कोच्या पूर्वेकडे 400 किलोमीटर अंतरावर देरझिंस्क येथील क्रिस्ताल या फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला. जखमींपैकी 4 जण गंभीर आहेत. तर 25 जण मध्यम आणि 9 जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र कोणीही ठार झाले नसल्याचे स्थानिक आपत्कालिन सेवेच्या प्रवक्त्याने सांगितले.
या स्फोटानंतर 100 मीटर परिसरामध्ये आगीचे लोळ उठले होते. स्फोटानंतर दोघेजण बेपत्ता असल्याचे वृत्त एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिले आहे. रशियातील तपास संस्थांनी या स्फोटामागील कारणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या फॅक्टरीमध्ये औद्योगिक मानकांचे उल्लंघन झाले होते का, याबाबत चौकशी केली जात आहे.