38 लाखाच्याऑनलाईन बॅंक फसवणुकीतील मास्टरमाईंड जेरबंद ( प्रभात एक्‍सक्‍लुजीव)

सायबर क्राईमची कामगिरी :दिल्लीतून मुख्य तर डेहराडून येथून दोन आरोपी ताब्यात
प्रशांत जाधव

सातारा-साताऱ्यातील एका कंपनीचा बॅंकेशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक सीम स्वाईप करुन घेऊन कंपनीच्या बॅंक खात्यातील 37 लाख 78 हजार रुपये पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील विविध बॅंक खात्यामध्ये ट्रान्सफर करत ऑनलाईन लूट करणाऱ्या टोळीतीच्या मास्टमाईंडला सायबर क्राईंमच्या पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या असल्याने मास्टरमाईंडचे नाव सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
यापूर्वी याच टोळीतील अभिषेक सूनिल कुमार (वय 20, रा. झिरकपूर,मोहाली, पंजाब), यादविंदर नरेंद्र सिंग (वय 34, रा. झिरकपूर, मोहाली, पंजाब) दिलशाद अहमद (वय 35,रा.गजरोला, उत्तरप्रदेश) यांना सातारा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने अटक केली आहे. मोळाचा ओढा येथील अभिजात इक्विपमेंट व अभिजात इंजिनिअर्स या कंपन्यांच्या अकाउंट व्यवस्थापकाच्या मोबाईलचे सीमकार्ड स्वाईप करून कंपनीच्या आयडीबीआय बॅंकेच्या खात्यातील 38 लाखाच्या रकमेवर या ऑनलाईन चोरट्यांनी डल्ला मारला होता.

कंपनीच्या व्यवस्थापकाच्या मोबाईवर “तुमचे सीमकार्ड अपडेट करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. तुम्ही मागणी केली नसल्यास आणि सीम सुरू ठेवण्यासाठी “121′ या क्रमांकावर तातडीने फोन करा,’ असा मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये काही अन्य क्रमांकही होते. सीम बंद व्हायला नको म्हणून मॅनेजरनी तातडीने “121′ क्रमांकावर फोन केला व पुढील प्रक्रिया केली. ऑनलाईन भामट्यांनी त्या व्यवस्थापकाच्या सीमचा नंबर त्यांच्याकडील ब्लॅंक सीमवर कॉपी करून घेतला. त्यानंतर कंपनीच्या बॅंक खात्यातून 37 लाख 78 हजार रुपये लंपास केले होते.

याबाबत ऑगस्ट महिन्यात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सायबर पोलिस ठाण्याकडे देण्यात आला. सायबरच्या मदतीने या गुन्ह्यातील माहितीचे तांत्रिक़ विश्‍लेषण बारकाईने केले. तक्रारदार यांच्या बॅंक खात्यावरून आरोपींनी वेगवेगळ्या बॅंक खात्यावर एकाच दिवशी पैसे ट्रान्सफर केले होते. त्याच बॅंक खात्याची माहिती घेत सायबरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कदम व कर्मचाऱ्यांनी अल्पावधीत सर्व ठिकाणांची व संशयितांची माहिती संकलित केली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पंजाब राज्यातील झिरकपूर तर उत्तरप्रदेशातील गजरोला या ठिकाणावरून आजपर्यंत तीन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. मात्र याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार शोधण्याचे मोठे आव्हाण पोलिसांच्या पुढे होते. त्यानुसार जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या सुचनेनुसार पो.नि.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखली स.पो.नि. गजानन कदम व कर्मचाऱ्यांनी अखेर गुरूवारी डेहराडून येथून दोन आरोपी तर दिल्लीतून मुख्य आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. ताब्यातील आरोपींच्या कायदेशीर बाबी पूर्ण होताच पोलिस आरोपींसह साताऱ्यात परतणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

जिल्हा पोलिस प्रमुखांनी करून दाखवले!
गत अठवड्यात माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलिस प्रमुखांनी फसवणूक प्रकरणाच्या मास्टरमाईंडच्या मुसक्‍या लवकरच आवळू असे सांगितले होते. त्यानुसार आरोपींच्या शोधाची योजना पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.पद्माकर घनवट,स.पो.नि.गजानन कदम यांनी आखत डेहराडून येथून दोन तर दिल्लीतून मास्टरमाईंडला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसांनी करून दाखवल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)