पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कराेना लसीचे 36 हजार डोस; वाचा लसीकरण केंद्रांची नावे

21 केंद्रांवर नियोजन : प्रत्येक केंद्रावरील शंभर जणांना देणार लस

पुणे  – सीरम कंपनीने तयार केलेल्या “कोविशिल्ड’ या करोना प्रतिबंधात्मक लसीचे 36 हजार डोस ग्रामीण भागासाठी आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात एकूण 21 केंद्रांवर ही लस दिली जाणार आहे.

 

जिल्हा परिषद आणि नगरपरिषद हद्दीतील महिला आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी केंद्रांसह काही खासगी रुग्णालयांत हे लसीकरण होणार आहे. गुरुवारपासून या डोसचे वितरण प्रत्येक केंद्रावर करण्यात येणार आहे.

 

 

जिल्हा परिषदेने स्थापलेल्या लसीकरण पथकाकडून प्रत्येक केंद्रावरील शंभर जणांना शनिवारी (दि. 16) लस देण्यात येणार आहे. संबंधित केंद्रातील अधिकाऱ्यांकडून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंतिम यादीनुसार हे लसीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

 

 

पुणे जिल्ह्यात लसीकरण होणारी ठिकाणे

 • महिला आरोग्य केंद्र, बारामती
 • उपजिल्हा रूग्णालय, मंचर
 • उपजिल्हा रूग्णालय, भोर
 • उपजिल्हा रूग्णालय, दौंड
 • उपजिल्हा रूग्णालय, इंदापूर
 • ग्रामीण रूग्णालय, जुन्नर
 • ग्रामीण रूग्णालय, चांडोली
 • ग्रामीण रूग्णालय, कान्हे फाटा
 •  ग्रामीण रूग्णालय, जेजुरी

 

 

 • ग्रामीण रूग्णालय, शिक्रापुर
 • ग्रामीण रूग्णालय, वेल्हे
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगवी
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, वारूळवाडी
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, कडूस
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, कार्ला
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, माले
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलसरे
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव ढमढेरे
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, वरवंड
 • प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबवडे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.