एनआरसीच्या भीतीने 36 वर्षांच्या महिलेची आत्महत्या

पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात-36 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. अशी माहिती तिच्या परिवाराने पोलिसांना दिली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला घाबरून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या परिवाराने केला आहे. शनिवारी जमालपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेली गावात शिप्रा सिकंदर यांनी मफलरने गळफास घेतला होता. त्यांना जमालपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

स्थानिक लोक म्हणाले की, शिप्राचा पती शुभेश शिकडर हा व्हॅन चालक आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. संसदेत नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यापासून शिप्रा घबरात असल्याचे त्यांचे मेहुणे बिपुल सिकंदर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.