दिल्लीतील गोशाळेतील 36 गायींचा मृत्यू 

संग्रहित छायाचित्र.....
नवी दिल्ली: दिल्लीतील द्वारका भागातील नजाफगड येथील एका गोशाळेमधील 36 गायी मृतावस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
घुमानहेरा गावातील या गोशाळेतील गायी मरण पावल्याची माहिती छवला पोलिस ठाण्याला मिळताच पोलिसांनी गोशाळेला भेट दिल्यावर हा प्रकार उघड झाला. या गोशाळेमध्ये एकूण 1400 गायी आहेत. त्यापैकी 36 गायी मरण पावल्या आहेत.
ही गोशाळा आचार्य सुशिल गोसदन ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येते. येथील मृत गायींच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ञांचे पथक तयार करण्याबाबत विशेष विकास आयुक्‍तांना कळवण्यात आले आहे.
त्यानुसार 6 डॉक्‍टरांचे पथक या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत. दिल्लीचे विकास मंत्री गोपाल राय यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून याबाबतचा अहवाल 24 तासांच्या आत मागवला आहे.
सुमारे 20 एकरामध्ये पसरलेल्या या गोशाळेची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली असून तेथे 20 कर्मचारी कामाला आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)