रजनीकांत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

‘कबाली’ या चित्रपटानंतर सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी ते ‘काला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्या दृष्टीनेच आता त्यांची तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाची संपूर्ण कलाविश्वात चर्चा सुरु असून, आता याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ट्विटरनेही हातभार लावल्याचे दिसत आहे.

ट्विटरवर तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये रजनीकांत यांच्या ‘काला’ रुपातील इमोजी लाँच करण्यात आले आहेत. ट्विटर इंडियाच्या अधिकृत अकाऊंटवरुन याविषयीची माहिती देण्यात आली. त्यामुळे सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित चित्रपटाविषयी प्रेक्षकांमधील उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये गेल्या काही काळापासून बरीच दिरंगाई झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण, तरीही आता सर्व अडथळे हळूहळू दूर झाले असून, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खिलाडी कुमार आणि रजनीकांत यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटातून नाना पाटेकर, हुमा कुरेशी, अंजली पाटील आणि पंकज त्रिपाठी हे चेहरेही झळकणार आहेत. पीए.रंजित दिग्दर्शित या चित्रपटात थलैवा रजनीकांत हे ‘काला’च्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या जावयाने म्हणजेच अभिनेता धनुषनेच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

https://twitter.com/TwitterIndia/status/1000955685352321024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)