पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आजतागायत 35 हजार 550 मुलांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदत आहे. “आरटीई’अंतर्गत राज्यात 9 हजार 432 शाळांमध्ये 96 हजार 684 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 2 लाख 22 हजार 584 ऑनलाइन अर्ज आले आहेत.
यात ऑनलाइन लॉटरीद्वारे 82 हजार 129 मुलांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. सुमारे 40 हजार मुलांचे शाळांमध्ये तात्पुरते प्रवेश झाले आहेत. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणी अभावी यातील काही जणांचे अजूनही निश्चित झालेले नाहीत. पुणे जिल्ह्यात 985 शाळांमध्ये 14 हजार 773 प्रवेशाच्या जागा आहेत.
यासाठी 55 हजार 813 अर्ज आले होते. यातील 14 हजार 567 मुलांना प्रवेशाची लॉटरी लागली. परंतु, त्यामधील 7 हजार 345 मुलांचे तात्पुरते प्रवेश झाले तर, 5 हजार 572 जणांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत.35,000 children enrolled in schools under RTE