दु:खद! अनेक रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या डाॅक्टरचा करोनामुळे मृत्यू; वैद्यकीय क्षेत्रात शोक

चंद्रपूर – राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांना जीवदान देणारे डाॅक्टर, नर्स यांनाही करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डाॅ. प्रशांत चांदेकर (वय 35 वर्ष) यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डाॅ. चांदेकर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर व औषधी विभागात कार्यरत होते. चांदेकर यांना गेल्या काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. त्यांना समान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात येत होते, मात्र रुग्णालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, करोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डाॅक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. अशातच डाॅक्टर यांचा करोनाने मृत्यू झाल्याच्या घटना मनाला चटका लावत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.