कोयनेत 35.08 टीएमसी पाणीसाठा

पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने बुधवारी सकाळपासून चांगली हजेरी लावली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्‍वर याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणात प्रति सेकंद 32996 क्‍युसेक्‍स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी 2085 फूट झाली असून पाणीसाठा 35.08 टीएमसी झाला आहे.

मागील वर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने काही प्रमाणात उसंत दिली. तर पुन्हा चांगली सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या सतरा तासात कोयना 183 मिलीमिटर, नवजा 227 मिलीमिटर, महाबळेश्‍वर 137 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.