पुणे – चोवीस तासांत 347 करोनाबाधितांची नोंद झाली असून, दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चार पुण्याबाहेरील आहेत.
शहरातील बाधितांची संख्या आता 1 लाख 70 हजार 697 झाली आहे. तर 1 लाख 60 हजार 832 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
शहरात आजपर्यंत एकूण 4,471 जण मृत्युमुखी पडले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5,394 असून, त्यातील क्रिटिकल रुग्णांची संख्या 408 आहे. यापैकी 246 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दिवसभरात 4,150 स्वॅबटेस्ट घेण्यात आल्या आहेत.