सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मंगळवारी 346 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, तर नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
नऊ बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात बनपुरी (ता. खटाव) येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे (ता. सातारा) येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी (ता. कराड) येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे (ता. कोरेगाव) येथील 81 वर्षीय पुरुष अशा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कराड येथे खासगी हॉस्पिटलमध्ये ओंड (ता. कराड) येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मायणी (ता. खटाव) येथील 70 वर्षीय पुरुष या 2 करोनाबाधितांचा अशा एकूण 9 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने 37430
एकूण बाधित 8275
घरी सोडण्यात आलेले 4449
मृत्यू 269
उपचारार्थ रुग्ण 3557