अतिवृष्टीमुळे 340 कोटींचा फटका

महापालिका मुख्यसभेतील प्रश्‍नोत्तरातून माहिती उघड

पुणे – संपूर्ण शहरात 25 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीत महापालिकेचे तब्बल 340 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पावसामुळे पाणीपुरवठा, पथ विभाग तसेच ड्रेनेज, उद्यान, विद्युत तसेच घनकचरा विभागाला बसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने डिसेंबरच्या मुख्यसभेसाठी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना दिली आहे.

पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी प्रशोत्तरात मागितली होती. 25 सप्टेंबर रोजी शहराच्या पूर्व तसेच दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहराला पुराचे स्वरुप आले होते. यात नागरिकांच्या कोट्यवधीच्या रुपयांची वाहने तसेच मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. तर महापालिकेसही या पावसाचा फटका बसला आहे.

त्यात सर्वाधिक 281 कोटींचे नुकसान पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाचे, तर पथ विभागाच्या सुमारे 51 कोटींचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, विद्युत विभागाकडील स्मशानभूमी तसेच पथदिवे, शहरातील 12 उद्यानांचेही नुकसान झाले असून हा आकडा जवळपास 340 कोटींचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.