नवी दिल्ली – दिल्ली हिंसाचाराबाबतची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना दिल्लीत धुमसणाऱ्या दंगलीविषयी 6 वायरलेस संदेश मिळाले होते. मात्र हे संदेश मिळाल्यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याची माहिती इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार माहितीतून समोर आली आहे.
या प्रकरणात कॉग्रेसच्या सोनिया गांधी आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
तत्पूर्वी, या हिंसाचारात मृत्यूमुखीच्या आकडा वाढत आहे. विविध रुग्णालयांशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. गेल्या दोन दिवसांत 120 हून अधिक लोकांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.