नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्राईम डाटाबेसकडील माहितीनुसार येत्या काही महिन्यांमध्ये विविध 34 कंपन्या समभागविक्रीद्वारे 33,516 कोटी रुपये उभे करणार आहेत. बजाज एनर्जी लि. (5450 कोटी), युटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी (4000 कोटी), साम्ही हॉटेल्स (2000 कोटी), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (2000 कोटी), पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज (1550 कोटी), होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लि. (1500 कोटी), श्रीराम प्रॉपर्टीज (1250 कोटी), नू विस्टा (1000 कोटी), बर्गर किंग इंडिया लि. (1000 कोटी), पुराणिक बिल्डर्स लिमिटेड (1000 कोटी), इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (1000 कोटी), एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स (1000 कोटी), बार्बेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लि (1000 कोटी) या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे.
त्याखेरीज आणखी काही कंपन्या आयपीओद्वारे बाजारातून भांडवल उभारणीसाठी तयारीत आहेत. त्यामध्ये ईएसफ स्मॉल फायनान्स बँक 976 कोटी), पॉवरटिका (800 कोटी), इंडियन रिन्यूबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (750 कोटी), माझगांव डॉक शिपबिल्डर्स (700 कोटी), ईझी ट्रिप प्लॅनर्स (510 कोटी), शाम स्टील इंडस्ट्रीज (500 कोटी), श्री बजरंग पॉवर अँड इस्पात (500 कोटी), नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हटिव्ह एक्सेंज (500 कोटी), स्टोव्ह क्राफ्ट (500 कोटी), अन्नाई इफ्रा डेव्हलपमेंट (250 कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे.
2017 मध्ये 36 कंपन्यांनी 67,147 रुपये बाजारातून उभे केले होते. 2015 पासूनचा विचार करता 2019 हे वर्ष आयपीओसाठी तसे मंदीचे ठरले. या वर्षात केवळ 16 कंपन्यांनी 12,362 कोटी उभे केले. त्याउलट यंदा लॉकडाऊनच्या काळात आलेल्या एसबीआय कार्डस् अँड पेमेंट सव्हिसेस तसेच रोझरी बायोटेक या कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. हॅपिएस्ट माईंडस्, रुट मोबाईल, कॅम्स, केमकॉन स्पेशालिटी केमिकल्स या कंपन्यांचा आयपीओ नुकताच येऊन गेला. त्यांनागुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कंपन्याखेरीज जयकुमार कनस्ट्रक्शन, ग्लांड फार्मा आणि कल्याण ज्वेलर्स या कंपन्याही आयपीओसाठी सेबीच्या परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत.
नजीकच्या काळात 29 सप्टेंबरला यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी, माझगांव डॉक आणि लिखिथा इन्फ्रा या कंपन्यांचा आयपीओ खुला होत असून तो 1 ऑक्टोबर रोजी बंद होईल. तीनही कंपन्या मुंबई शेअऱ बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) 12 ऑक्टोबर रोजी पदार्पण करतील.