संगमनेर : जोर्वे नाका परिसरात शहर पोलिसांनी 70 हजार रुपयांची देशी दारू पकडली

संगमनेर : एका संशयित इंडिका कारमधून शहर पोलिसांनी 70 हजार रुपयांची देशी दारू पकडली. रविवारी रात्री पोलिसांनी नाशिक-पुणे मार्गालगतच्या जोर्वे नाका परिसरात ही कारवाई केली. कारवाईत इंडिका कारसह सुमारे पावणे तीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी  ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एम एच १७ एजे ९८३५ या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इंडीका कारमधून बेकायदा दारुची वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार  निरीक्षक औताडे, डीबीचे ईस्माईल शेख, बाळासाहेब अहिरे, सुनील ढाकणे, गोरक्ष शेरकर आणि आशिष आरवडे यांनी संशयित वाहन नाशिक-पुणे मार्गावर जोर्वेनाक्याच्या पुढे नाटकी नाल्याजवळील पुलावर अडविले.

मिळालेल्या माहितीप्रमाणे दारुची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी लगेचच संबधित वाहन ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तेथे  तपासणी केली असता देशी संत्रा दारुच्या बाटल्या आढळून आल्या. बाजारभावाप्रमाणे पोलिसांनी पकडेल्या दारुची किंमत ६९ हजार १२० रुपये असून दारु वाहतुकीसाठी वापरली गेलेली दोन लाख रुपये किमतीची इंडिकादेखील पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलीस नाईक आशिष आरवडे यांच्या तक्रारीवरुन आरोपी जाकिर जमालभाई शेख (वय ४५, रा. जोर्वे, संगमनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)