खेडमध्ये एका दिवसात तब्बल 330 पॉझिटिव्ह; तर तिघांचा मृत्यू

राजगुरूनगर -खेड तालुक्‍यात मागील 24 तासांत 330 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर वराळे, राजगुरूनगर, डेहणे येथील प्रत्येकी एका अशा तीन व्यक्‍तींचा मृत्यू झाला असून 249 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, तालुक्‍यात आतापर्यंत 150 च्या आसपास गावे करोना बाधित झाली आहेत.

मागील 24 तासांत चाकण (55), राजगुरूनगर (45), आळंदी (38) या तीन नगरपरिषदांच्या हद्दीत 138. ग्रामीण भागातील निघोजे (25), महाळुंगे इंगळे, बहिरवाडी (प्रत्येकी 11), नाणेकरवाडी (10), खराबवाडी, मेदनकरवाडी (प्रत्येकी 9), कुरूळी (8), चिंबळी, आंबेठाण (प्रत्येकी 7), कडूस, वासुली (6), रासे, चऱ्होली खुर्द (5), शेलू, वाकी बुद्रुक, बिरदवडी, होलेवाडी (प्रत्येकी 4), दावडी, पिंपरी बुद्रुक, कडाचीवाडी, पाईट, येलवाडी (प्रत्येकी 3), खालुंब्रे, भोसे, गोलेगाव, गोसासी, गुंडाळवाडी, खरपुडी बुद्रुक, मरकळ, निमगाव, सायगाव, शिंदे,

वडगावपाटोळे, वाकी खुर्द, सातकरस्थळ (प्रत्येकी 2), चांडोली, चास, धानोरे, दोंदे, गाडकवाडी, काळूस, करंजविहीरे, मोई, पिंपळगाव, रानमळा, रेटवडी, संतोषनगर, सावरदरी, शेलगाव, शेलपिंपळगाव, वाफगाव (प्रत्येकी 1) या 51 गावांमध्ये 192 असे एकूण 330 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

तालुक्‍यात आतापर्यंत बाधितांची संख्या 21 हजार 152 वर पोहोचली असून 18 हजार 409 जणांनी करोनावर मात केली आहे. 247 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्‍याच्या ग्रामीण भागात 1 हजार 579, चाकण 482, आळंदी 148, राजगुरूनगर 287 असे एकूण 2 हजार 496 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.