32 म्युटेशनचा सामना : एचआयव्ही बाधित महिलेची करोनावर मात

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – जगभरात कोरोना व्हायरसचा कहर अजून कायम आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसचे बदलले रुप म्हणजे म्युटेशनमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक रुग्णांमध्ये कोरोनाचे एखादे म्युटेशन, डबल म्युटेशन किंवा ट्रिपल म्युटेशन सापडल्याचे आपण ऐकले आहे.

पण दक्षिण आफ्रिकेतील एका एचआयव्हीग्रस्त (HIV) महिलेमध्ये कोरोनाने 32 वेळा रुप बदल्याची आश्‍चर्यकारक आणि हैराण करणारी घटना समोर आली आहे. याचा अर्थ असा की, या महिलेच्या शरीरात कोरोनाचे 32 म्युटेशन आढळले आहेत. तसेच तिच्या शरीरामध्ये कोरोना व्हायरस 216 दिवस होता. एचआयव्हीग्रस्त असूनही या महिलेने कोरोनावर मात केल्याने हा विअद्यक क्षेत्रातील एक चमत्कार मानला जात आहे.

या महिलेच्या शरीरात 13 म्युटेशन (जेनेटिक उत्परिवर्तन) स्पाईक प्रोटीन सापडले. हे प्रोटीन कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. तसेच 19 म्युटेशन असे आढळले, ज्यामध्ये व्हायरस बदलण्याची क्षमता होती. तसेच यापैकी महिलेच्या शरीरात कोरोनाची असे काही रुप होते, जे बाहेरच्या लोकांना झाले आहे की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

जर अशा प्रकारे रुग्ण आढळले तर एचआयव्ही आजारासह कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका अधिक वाढतो, या शक्‍यतेला अजून बळ मिळेल. कोणताही आजार असेल तर कोरोनाशी लढताना आपले मानसिक स्वास्थ्य ढळलेले असते. अशा परिस्थितीत कोरोनासोबतची लढाई दीर्घकाळापर्यंत चालते आणि धोका जास्त असतो. या महिलेमध्ये हेच दिसून आले. मात्र या महिलेने कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

एका रुग्णाच्या शरीरात कोरोना म्युटेशन आढळल्याचे प्रकरण कधीच समोर आले नसते. कारण एचआयव्हीग्रस्त महिलेत कोरोनाची कोणतीही विशेष लक्षणे नव्हती. एचआयव्हीग्रस्त कोरोनाबाधित रुग्णांना समजण्यासाठीच्या शोधात 300 जण सहभागी झाले होते. त्यापैकी ही एक महिला होती. यादरम्यान महिलेच्या तपासणीत अनेक गोष्टी समोर आल्या. तसेच या शोधात चार असे लोकं समोर आले, ज्यांच्यामध्ये एक महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कोरोना होता. परंतु त्यांच्यामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नव्हती.

ही आश्‍चर्यकारक आणि हैराण करणारी घटना दक्षिण आफ्रिकेमधील आहे. मेडआरएक्‍स-4 जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात याचा खुलासा झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.