नवी दिल्ली – दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 32 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
#Delhi: 32 people dead in fire incident at Rani Jhansi Road, says Delhi Police pic.twitter.com/bSFKc98btO
— ANI (@ANI) December 8, 2019
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची 27 वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
जून्या दिल्लीतील राणी झांसी रोडवर असलेला फिल्मस्तान सिनेमागृहाबाहेर आग लागली. पहाटे पाच वाजता आग लागल्यामुळे सर्वजण गाढ झोपेत होते. घटनास्थळी ३० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झालेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावर आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आहे.