नायजेरियात 317 मुलींचे अपहरण; आठवडाभरातील दुसरी घटना

अबुजा – नाजयेरिया या देशात आठवडाभराच्या आत अपहरणाची दुसरी मोठी घटना घडली असून आता एका शाळेतील तब्बल 317 मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. जंगेबे या भागात ही घटना घडली असून सरकारकडून खंडणी वसुल करण्यासाठी हे प्रकार होत असल्याचे सांगितले जाते आहे. अज्ञात बंदुकधाऱ्यांनी मुलींच्या सरकारी शाळेत प्रवेश करून धाक दाखवत या मुलीयचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आता मुलींच्या सुटकेसाठी पोलिसांसोबत लष्कराच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असून संयुक्त कारवाई हाती घेण्यात आली आहे.

खंडणी उकळण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला असला तरी सरकारने मात्र खंडणी देण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात 27 विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी असे एकूण 22 जणांचे अपहरण करण्यात आले असून त्यांचीही अद्याप सुटका करण्यात आलेली नाही. बोको हराम या दहशतवादी संघटनेची या भागात दहशत असून त्यांच्याकडूनच या घटना घडवल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.