कराड शहर हद्दीत 316 प्रतिबंधात्मक कारवाया

229 पैकी 152 शस्त्रे जमा 

कराड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कलमान्वये शुक्रवारपर्यंत 316 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहर हद्दीतील एकूण 229 शस्त्र परवानाधारकांपैकी पैकी 152 जणांनी आपली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. ज्यांनी शस्त्रे जमा केली नाहीत, त्यांनी तातडीने शस्त्रे जमा करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी निवडणुकीच्या काळात पूर्वी गुन्हे दाखल झालेल्यांवर आता प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. या अनुषंगाने शहर पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारपर्यंत 316 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत, तर शस्त्रे जमा करून घेण्याचीही कार्यवाही सुरू आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 229 शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी 152 जणांनी आतापर्यंत आपली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. उर्वरीत शस्त्र परवानाधारकांनीही तातडीने शस्त्रे जमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.