3,098 नवे करोना बाधित, ऍक्टिव्ह केसेस 24 हजारांवर
पुणे – शहरात करोनाने गेल्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला असून, तर, अन्य 9 जण पुणे हद्दीबाहेरील आहे. यांचा समावेश करून मंगळवारी मृतांची संख्या 31 झाली आहे. तर, दिवसभरात 3 हजार 98 रुग्णांची वाढ झाली आहे.
आजपर्यंत 2 लाख 40 हजार 834 बाधित रुग्ण असून, त्यातील 2 लाख 11 हजार 304 रुग्ण बरे झाले आहेत; तर 5 हजार 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बाधित रुग्णांमधील ऍक्टिव्ह रुग्ण 24 हजार 440 असून, त्यातील 555 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर तब्बल 1 हजार 20 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात 11 हजार 310 संशयितांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून, आजपर्यंत 13 लाख 49 हजार 999 संशयितांच्या टेस्ट झाल्या.