पुण्यातून 31, बारामतीमधून 18 उमेदवार रिंगणात

अर्ज मागे घेण्याची मुदत संपली : लढतीचे चित्र स्पष्ट

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 तर बारामती मतदारसंघातून 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतली. त्यामुळे आता पुणे मतदारसंघातून तब्बल 31, तर बारामतीमधून 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

पुणे व बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे पुणे व बारामतीमधील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 46 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर बारामती मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी (दि.5) झाली. यामध्ये पुणे मतदारसंघात 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर बारामती मतदारसंघातील 6 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात 43 उमेदवार तर बारामती मतदारसंघातून 25 उमेदवारांचे अर्ज होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पुण्यातून 12 तर बारामतीमधून 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. दरम्यान पुणे व बारामती मतदारसंघासाठी दि.23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
गिरीश बापट – भारतीय जनता पार्टी
मोहन जोशी – कॉंग्रेस
उत्तम शिंदे – बहुजन समाज पार्टी
अनिल जाधव – वंचित बहुजन आघाडी


बारामती मतदारसंघातील प्रमुख उमेदवार
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी कॉंग्रेस
कांचन कुल – भारतीय जनता पार्टी
ऍड. मंगेश वनशिव – बहुजन समाज पार्टी
नवनाथ पडळकर – वंचित बहुजन आघाडी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.