31 हजार वृक्ष लागवड पुर्ण

– महापालिकेचे उद्दिष्ट्य पुर्ण होणार का?

पिंपरी – महापालिका हद्दीत यावर्षी 60 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. शहरात आत्तापर्यंत 31 हजार 419 वृक्ष लागवड करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरणाचा समतोल रहावा या उद्देशाने राज्य सरकारने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्यात सहभागी होत महापालिकेने 60 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. मात्र, आत्तापर्यंत 50 टक्केच वृक्ष लागवड झाली आहे. त्यामुळे येत्या 31 जुलैअखेरपर्यंत वृक्ष लागवड पुर्ण होईल, असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उद्दीष्ट्य पुर्ण होईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

या ठिकाणी झाले वृक्षारोपण ः – अ प्रभाग – 760, ब प्रभाग – 247, क प्रभाग 2,210, ड प्रभाग 1131, इ प्रभाग 648, फ प्रभाग 440, ह प्रभाग – 886, ग प्रभाग – 120, अ प्रभाग उद्यान 99, ब प्रभाग उद्यान- 500, क प्रभाग उद्यान 197, ड प्रभाग उद्यान 147, इ प्रभाग उद्यान – 90, ह प्रभाग उद्यान -132, दुर्गादेवी टेकडी – 75, रेल्वे लाईनच्या वतीने मेट्रोच्या मार्फत – 50, नदीच्या कडेने 1200, लष्कराच्या हद्दीत – 16,180, रोपवाटीकेतून विक्री व वाटप – 5,580, गृहरचना संस्था – 2,787.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)