विभागात कोरोना बाधित १ हजार ९०५ रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे :– पुणे विभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोना बाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 13 बाधित रुग्ण आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण 1 हजार 383 असून कोरोना बाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.