मुंबई – मार्च 31 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रिझर्व बॅंक केंद्र सरकारला 30,307 कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे.
रिझर्व बॅंकेच्या संचालक मंडळाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला असून अतिरिक्त रक्कम लवकरच केंद्र सरकारला सुपूर्त करण्यात येईल. गेल्या वर्षी रिझर्व बॅंकेने केंद्र सरकारला 99 हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.
यावर्षी रिझर्व बॅंकेसह सरकारच्या मालकीच्या इतर बॅंकाकडून केंद्र सरकारला 74 हजार कोटी रुपयांचा लाभांश अपेक्षित आहे. या बैठकीत संचालक मंडळाने देशातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.