पुणे – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील 3 हजार 321 करोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्ण 3 हजार 178 आहेत. यातील 210 रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
पुणे जिल्ह्यात 5 हजार 616 बाधित रुग्ण असून, 2 हजार 905 रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 2 हजार 444 आहे. करोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. सातारा जिल्ह्यात 278 करोनाबाधित रुग्ण असून 114 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 157 आहे.एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर- 570 करोनाबाधित रुग्ण असून 249 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 275 आहे. तर, 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत 73 करोनाचे रुग्ण असून 40 जण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 31 असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात 286 करोनाबाधित रुग्ण असून 13 जण ठणठणीत झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 271 आहे. तर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.