फ्रान्समध्ये 3 हजार आरोग्य कर्मचारी निलंबित ; मुदतीत लसीकरण न झाल्याने कारवाई

पॅरिस – फ्रान्समध्ये मुदतीत कोविड-19 विरोधी लसीकरण न केल्याने 3 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना कोणत्याही मानधनाशिवाय निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री ऑलिव्हर वॅरेन यांनी ही माहिती दिली.

बुधवारी याबाबतची अधिसूचना जीरी करण्यात आली. मात्र या निलंबनाच्या कारवाईवरील प्रतिक्रिया म्हणून काही डझन आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले राजीनामेच सादर केले आहेत, असेही वॅरेन यांनी सांगितले. संपूर्ण आरोग्य क्षेत्रावर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी हमीही त्यांन दिली.

अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, अग्निशामक दल, निवृत्त कर्मचाऱ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत लसीकरण करून घेण्याची मुदत जुलै महिन्यातच दिली होती. जर या मुदतील लसीकरण करन घेतले नाही तर विनामोबदला निलंबनाची कारवाई केल जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे वॅरेन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.