तीन गुन्ह्यांमध्ये 3 हजारांचा दंड

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांत 54 गुन्हे दाखल

नगर लोकसभा निवडणुकी येऊ घातलेल्या आहे. या पार्श्‍वभूमीवर 2004, 2009 आणि 2014 मधील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पोलिसांकडे आचारसंहिता कायद्यातील तरतुदींनुसार दाखल असलेल्या 54 गुन्ह्यांतील तीन गुन्ह्यांमध्ये 3 हजार 100 रुपये दंडांची शिक्षा आरोपींना झाली आहे. कोतवालीत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हा दंड झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणूक 2004 मध्ये कोतवाली दोन गुन्हे दाखल होते. त्यातील एक गुन्हातील आरोपी निर्दोष सुटले आहे. दुसरे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. लोणी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. लोकसभा 2009 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील एक गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना प्रत्येकी दीड, एक हजार आणि सहाशे रुपयांचा दंड झाला आहे. पाच गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. तोफखान्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्हा “अ’ फायनल करण्यात आला आहे. एमआयडीसीत दोन्ही गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटले आहेत.

कर्जत, श्रीगोंदे व जामखेड पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असून, त्यातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. पाथर्डीत एक गुन्हा दाखल आहे. श्रीरामपूरमध्यदोन गुन्हे दाखल असून, ते “अ’ फायनल करून पोलिसांनी ते कायमस्वरुपी तपासावर असल्याचे म्हटले आहे. शिर्डी, राहाता व लोणी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्यातील राहाता पोलिसांकडील गुन्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंद करण्यात आला आहे.

लोकसभा 2014 मध्ये कोतवाली दोन गुन्हे दाखलअसून, त्यातील एक निर्दोष आणि दुसरा गुन्हा अजून न्यायप्रविष्ट आहे. तोफखाना पोलिसांकडे एक गुन्हा दाखल आहे. कर्जतमधील एकाचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तपास बंद करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. तिसरी तक्रारीची अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद आहे. शेवगावमध्ये एक गुन्हा दाखल आहे. पाथर्डीत आठ गुन्हे दाखल असून, त्यातील दोन अदखलपात्र गुन्हे आहेत. यातील चार गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. श्रीरामपूरमध्ये दाखल गुन्हा चार वर्षे पाच महिन्यांपासून न्यायप्रविष्ट आहे. संगमनेरमध्ये चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील एक गुन्ह्यातील केस सुटली आहे. अकोले तालुक्‍यात चार गुन्हे दाखल होते. त्यात दोन गुन्हे फायनल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)