-->

मागील दोन महिन्यांत करोनामुळे 300 मृत्यू

221 रुग्ण 60 वर्षे वयावरील; 79 जणांचा फक्त करोनामुळे मृत्यू

पुणे -यावर्षी मागील दोन महिन्यांत करोनामुळे 300 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 221 रुग्णांना अन्य आजारही होते. तसेच मरण पावलेल्यांपैकी 223 रुग्ण हे साठ वर्षे वयावरील होते, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी दिली.

पुणे शहरात मागीलवर्षी 9 मार्चला पहिला करोना बाधित रुग्ण आढळला. यानंतर अवघ्या 21 दिवसांनी करोनाचा पहिला बळी गेला. तेव्हापासून आतापर्यंत 4 हजार 821 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

यापैकी बहुतांश रुग्णांना अन्य आजारही होते. अशातच करोना झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. परंतू फक्त करोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याचे आतापर्यंत समोर येत आहे.

नोव्हेंबरपासून बाधितांची संख्या काहीअंशी कमी झाली. परंतू मागील दोन महिन्यांतील मृत्यूंचे सर्वेक्षण केले असता, मृतांपैकी 79 रुग्णांना करोना व्यतिरिक्त अन्य आजार नव्हते.

मात्र, प्रत्येक व्यक्तिच्या शरीरात अल्सर, टीबीसारख्या आजारांचे अंश असतात. करोनामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन हे आजारही उफाळून येण्याची शक्‍यता असते. मात्र, त्यांचे निदान झालेले नसते, असे डॉ. भारती म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.