बाॅम्ब बनविण्याचे प्रशिक्षण सुरू असताना स्फोट; 30 दहशतवादी ठार

काबूल : अफगाणिस्तानमधील एका मशिदीत बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण सुरू असताना स्फोट होऊन 30 दहशतवादी ठार झाले आहेत. ही घटना बाल्फ प्रांतातील दौलताबाद जिल्ह्यातील कुल्ताक गावात घडली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये परदेशातून आलेल्या सहा दहशतवाद्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भूसुरूंग बनवण्याच्या कामातील तज्ज्ञ असलेले सहा दहशतवादी हे बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते. ते शनिवारी 26 अन्य दहशतवाद्यांना बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत होते. प्रशिक्षण सुरू असतानाच स्फोट होऊन 30 दहशतवादी ठार झाले आहेत.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे तालिबानी दहशतवादी एका मशिदीत एकत्र आले होते. येथे त्यांना आयईडी आणि बाॅम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. अफगाणिस्तान लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या सहा परदेशी दहशतवाद्यांची ओळख पटवता आली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.