सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ३० जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ४५२ झाली आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील ५० वर्षीय पुरुष व तामिणी (ता. पाटण) येथील ७ वर्षीय मुलगी करोबाधित असल्याचा रिपोर्ट सायंकाळी आला. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी (ता. सातारा) येथील २१ व ४८ वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले त्यामुळे सायंकाळपर्यंत एकूण ४ बाधित रुग्ण आढळले, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. २६ मे रोजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या ५४ वर्षीय पुरुषाचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. २१४ जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा सातारा जिल्यात नवीन २६ करोनाबाधितांची भर पडली. या २६ रुग्णांची तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे
पाटण – सळवे १, सदूवरपेवाडी १, करपेवाडी १, गलमेवाडी १, घनबी १,
कराड – म्हासोली ८,भरेवाडी १, वानरवाडी ३.
फलटण – सस्तेवाडी १
वाई – जांभळी ६
जावळी – आपटी १, केळघर १
जावळी तालुक्यातील केळघर ( तेटली ) येथील मुंबईवरून आलेल्या चार वर्षे आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू २६ मे रोजी झाला होत मृत्यूनंतर आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.