बॉलीवूडमधील सर्वाधिक सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री पैकी एक असलेली जॅकलीन फर्नांडिस सतत सोशल साईट्सवर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक अपडेट्ससाठी उत्सुक असतात. त्यामुळेच तिच्या चाहत्यांच्या संख्या सातत्याने भर पडत असते. जॅकलीनच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे तब्बल 30 मिलियन फॉलोअर्स आहेत. याचा आनंद तिने एका खास अंदाजात शेअर केला आहे.
हा आकडा गाठल्याने उत्साहात असलेल्या जॅकलीनने एक खुपच सुंदर असा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत एक प्रेमळ असा संदेशही पोस्ट केला आहे. या संदेशात तिने चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच जीवनाच्या चढ-उतारात साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
दरम्यान, जॅकलीन फर्नांडिसच्या वर्कफ्रंटबाबात बोलायचे झाल्यास ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत झळकणार आहे. साजिद नाडियावाला यांच्या आगामी “किक 2’मध्ये ही जोडी स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट यंदाच्यचा ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.