पाकिस्तानात बस अपघातात 30 ठार, 40 जखमी

लाहोर – पाकिस्तानमध्ये झालेल्या बस अपघातात किमान 30 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये बहुसंख्य मजूर असून, हे सर्वजण ईद उल अजहासाठी आपापल्या गावी परत चालले होते. या अपघातात 4 जण जखमीदेखील झाले आहेत.

ही बस सियालकोटवरून राजनपूरला चाचली होती. पंजाब प्रांतातल्या डेरा घाझ खान जिल्ह्यात एका ट्रेलर ट्रकला या बसची धडक बसली. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी 18 जणांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

पाकिस्तानमध्ये महामार्गांवर भरधाव वेगाने वाहने चालवल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे. याशिवाय खराब रस्ते आणि अप्रशिक्षित चालकांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.