गुजरातमधील 30 मच्छिमारांना पाकिस्तानकडून अटक

अहमदाबाद – पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने सोमवारी गुजरातमधील 30 मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या 6 नावाही त्या यंत्रणेने जप्त केल्या. ते मच्छिमार काही दिवसांपूर्वी मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ त्यांना पकडण्याची आगळीक पाकिस्तानने केली. गुजराती मच्छिमारांनी आमच्या सागरी हद्दीत अवैध शिरकाव केल्याचा कांगावा त्या देशाच्या यंत्रणेकडून करण्यात आला. भारतीय मच्छिमारांना अटक करण्याच्या आगळिकी पाकिस्तानकडून सातत्याने केल्या जातात, असा आरोप गुजरातमधील मच्छिमार संघटनेने केला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सदिच्छा पाऊल उचलत अनेक भारतीय कैद्यांची मुक्तता केली. त्यात बहुतांश गुजरातमधील मच्छिमार होते. पाकिस्तानच्या त्या कृतीला अवघे काही दिवस झाले असतानाच त्या देशाने पुन्हा कुरापत काढली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.