30 मृतदेह हाती – शोधकार्य थांबवले

सातारा:प्रतिनिधी
पोलादपूर येथे झालेल्या बस अपघातानंतर सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आलं असून दरीतून सर्व 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पिकनिकसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसला शनिवारी भीषण अपघात झाला. बस महामार्गावरून घसरून 800 फूट दरीत जाऊन कोसळली. या बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी फक्त एका प्रवाशाचा जीव वाचला.सर्व मृतांवर दापोली येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या अपघातानंतर गिर्यारोहकांचं पथक, एनडीआरएफसह सर्व बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पाऊस, धुके यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र, त्यावर मात करत बचाव यंत्रणांनी सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढले. शनिवारी दुपारपासून सुरू झालेला मृतदेहांचा शोध रविवारी दुपारच्या सुमाराला समाप्त झाला आहे. दरीतून बाहेर काढलेले 30 मृतदेह तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
जे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत त्यांची नावे: विक्रांत शिंदे ,सचिन गिम्हवणकर,निलेश तांबे,संतोष झगडे ,राजेंद्र विरकुड,संजू झगडे,प्रशांत भांबेड,रत्नाकर मधुकर पागडे,सचिन चंद्रकांत झगडे,प्रमोद मोहन शिगवण,सुनील कदम,राजाराम गावडे,प्रमोद जाधव,पंकज कदम,रितेश जाधव,विनायक सावंत,संदीप सुवरे,सुनील साठले,राजेंद्र बंडबे,सुयश बाळ,संदीप झगडे,सचिन गुजर,रोशन तबीब,दत्तात्रय धायगुडे,हेमंत सुर्वे,किशोर चौगुले,संदीप भोसले,संतोष जळगावकर,राजेश सावंत,जयवंत हरिश्‍चंद्र
ट्रेकर्स आणि एनडीआरएफच्या टीमने 30 जणांचे मृतदेह बाहेर काढले.इतर तीनजणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. घाटात या तिघांशी संबंधित कोणताही सुगावा न लागल्याने अखेर या बचाव पथकाने त्यांचे शोधकार्य थांबवले आहे.बसमध्ये 31 प्रवासीच असावेत अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.या अपघातात एक लॅब बॉय, दोन चालक, 9 वरिष्ठ लिपिक, 11 कनिष्ठ लिपिक आणि तीन सहाय्यक अधिक्षकांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनाही त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र हे सर्व मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांकडून या मृतदेहांची ओळख पटविण्यात आली.मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.दापोली येथे शवविच्छेदन करण्यात आले.सर्व मृतांवर दापोली येथेच शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)