30 कोटींची विकास कामे मंजूर

पिंपरी – शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 30 कोटी 72 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये स्थापत्य विभागाच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या साप्ताहिक सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

कासारवाडी येथील आरक्षण क्रमांक 13 विकसित करण्यासाठी 12 कोटी 64 लाख 80 हजार रुपये, महापालिकेच्या विद्युत मुख्यकार्यालयाकडील औंध रावेत रस्त्यावरील साई चौक येथील पुलास बाधा करणारी अति उच्चदाब वीज वाहिनी स्थलांतरित करण्यासाठी 7 कोटी 11 लाख रुपये, स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्रमांक 48 येथील विमल गार्डन ते नढेनगर पर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणासाठी 3 कोटी 76 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्रमांक 7 येथील चोविसावाडी परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 58 लाख 63 हजार रुपये, प्रभाग क्रमांक 19 येथील वाल्हेकरवाडी प्रेरणाशाळा व चिंतामणी चौक परिसरातील डांबरीकरणासाठी 54 लाख 25 हजार रुपये, जलनिस्सारण विभागाकडील प्रभाग क्रमांक 24 थेरगाव येथील वनदेवनगर, आनंद हॉस्पिटल परिसर, बेलठिकानगर परिसरातील कामासाठी 75 लाख रुपये, शाहूनगर येथील के. एस. बी चौक ते नंदिनी हॉटेलपर्यंत सेवा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 26 लाख 29 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली

स्थापत्य विभागाकडील चिखली मैलाशुध्दीकरण केंद्राच्या उर्वरित जागेत आकर्षक लॅंडस्केपिंग करण्यासाठी 3 कोटी 98 लाख 25 हजार रुपये, त्रिवेणीनगर चौक ते नाशिक भोसरी रस्त्याचे सुशोभिकरण व उद्यान देखभालीसाठी 76 लाख 10 हजार रुपये, अ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील उद्यान नुतनीकरणासाठी 31 लाख 20 हजार रुपये, पाणी पुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र सेक्‍टर क्रमांक 23 येथे जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी थल्युमिनियम क्‍लोराईड खरेदीसाठी 1 कोटी 8 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)