पाण्याच्या बादलीत बुडून 3 वर्षीय मुलीचा मृत्यू

भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील मिसरोद इथे एका तीन वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचे आई-वडील दुसऱ्या खोलीत झोपले असताना ही मुलगी खेळत खेळत बाथरूम मध्ये गेली आणि तिचा तोल जाऊन ती पाण्याच्या बादलीत पडल्याने तीचा मृत्यु झाला. ही घटना शनिवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आई-वडिलांची प्रकृती काहीशी बरी नसल्याने दोघंही औषध घेऊन दुसऱ्या खोलीत आराम करत होते.

आई-वडिलांसोबत तीन वर्षीची मुलगी देखील ही त्याच खोलीत झोपली होती. पण तिला अचानक जाग आल्याने ती खोलीतून बाहेर आली. त्यानंतर ती बाथरूममध्ये चालत गेली. तिथेच पाण्याने भरलेली एक बादली होती. याच ठिकाणी अचानक तोल गेल्याने चिमुकली थेट बादलीत पडली. पण तिला बादलीतून बाहेर येता आल्याने तिचा पाण्यातच बुडून मृत्यू झाला.

जेव्हा मुलीचे आई-वडील झोपेतून जागे झाले तेव्हा त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी जेव्हा ते बाथरूममध्ये गेले तेव्हा त्यांची मुलगी ही पाणी भरलेल्या बादलीमध्ये बुडाली होती. त्यावेळी त्यांनी तात्काळ मुलीला बादलीच्या बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.