इंडोनेशियात पुन्हा एकदा भूंकप; तीन पर्यटकांचा मृत्यू

जकार्ता – इंडोनेशिया शहर पुन्हा एकदा भूंकपाचे धक्क्यांने हादरले आहे. इंडोनेनिशायातील लोम्बोक बेटावर 4.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाची नोंद झाली आहे.

या भूंकपामध्ये तीन पर्यटकांची मृत्यू झाला असून 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. भूंकपानंतर भूस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा भूंकप रिन्जनी शहराच्या जवळील सेनारू गावातील तियू केलेप धबधब्याजळ झाला असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांतात पूरामुळे किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे इंडोनेशियातील सेन्तानी नदीला पूर आल्यामुळे जयपुरा या राजधानीच्या शहराला जोरदार पूराचा फटका बसला आहे. या पूरापाठोपाठ अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. या सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे किमान 59 जण जखमी झाले आहेत.

इंडोनेशियात पूरामुळे 50 बळी

 

Leave A Reply

Your email address will not be published.