नवी दिल्ली – कोविड-19 सारख्या साथीच्या आपत्कालिन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी मार्च महिन्यात उभारण्यात आलेल्या ‘पीएम-केअर्स’ निधीमध्ये प्रारंभीच्या केवळ 5 दिवस दिवसांतच 3,076.62 कोटी रुपये जमा झाले होते. या निधीबाबतचा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
‘रिसीट ऍन्ड पेमेंट अकाउंट’मध्ये’ स्वेच्छा योगदान म्हणून सुमारे 3,075.62 कोटी रुपये जमा केले गेले, तर 39.67 लाख रुपये परदेशातील वर्गणी म्हणून जमा झाले आहेत. 31 मार्च 2020 रोजी व्याज आणि फॉरेक्स व्यवहारांसाठीचा सेवा कर वजा केल्यावर या निधीमध्ये 3,076.62 कोटी रुपये जमा झाले होते.
‘पीएम-केअर्स’ निधीमध्ये सुरुवातीला 2.25 लाख रुपयांची वर्गणी जमा झाली होती, असे या निधीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
या निधीमध्ये केवळ स्वेच्छेने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले असून या निधीसाठी अर्थसंकल्पातील कोणतीही तरतूद नाही.