Pune | भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी 3 आत्महत्येच्या घटनेने शहरात खळबळ

पुणे – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारी एकाच दिवशी तीन आत्महत्येच्या घटना घडल्या. यामध्ये एक वाहन चालकाचा समावेश आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी जगन्नाथ कलसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी उद्यानासमोर एका अज्ञात व्यक्तींने गळफास घेत आत्महत्या केली, त्याची ओळख पटू शकली नाही, तर एका वाहन चालकाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या  केली. तिसऱ्या एका घटनेत एकटाच रहाणाऱ्या तरुणाने गळफास घेतला.

या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही वाहन चालक असलेला व्यक्ती महिणाभर बेरोजगार होता ़़त्याला त्याचा मित्र दररोज जेवणाचा डबा देत होता.

आज दुपारी तो डबा द्यायला आल्यावर ही घटना उघडकीस आली तर दुसरा आत्महत्या केलेला व्यक्ती सुखसागरनगर येथे एकटाच रहात होता, त्याला त्याचा मित्र सतत फोन करत होता. मात्र फोन न उचलल्याने तो घरी गेल्यावर आत्महत्येचा परकार दिसला

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.