भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना 6 फेब्रुवारी रोजी पार पडला. नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 4 विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. या विजयासह सिरीजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंचा फॉर्म हा टीमसाठी चिंतेचा विषय आहे. भारताचा दुसरा वनडे सामना हा 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे मात्र त्या अगोदर हे खेळाडू फॉर्ममध्ये आले पाहिजेत.चला तर मग या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया…
1) कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म
भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. मागील काही सामान्यांपासून रोहित शर्माला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. तो धावांची झगडताना दिसला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधाराचा असा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. जर रोहित शर्माला या सिरीजमध्ये फॉर्म गवसला नाहीतर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
2) विराट कोहली दुखापत
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्याग्रस्त आहे. विराट कोहलीच्या उजव्या गुडघ्यात वेदना होत असल्याने तो पहिला सामना खेळू शकला नाही. त्यामुळे टीममध्ये विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आले. श्रेयस अय्यरने संधीचे सोने करत पहिल्या सामन्यात ३६ बॉलमध्ये ५९ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. विराट हा 2023 मध्ये झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटची हे दुखापत गौतम गंभीर आणि टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होऊ शकते.
3) जसप्रीत बुमराह
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीचा फटका भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही बसला. सामन्याच्या दुसऱ्या डावात बुमराहला गोलंदाजी करता न आल्याने भारताला तो सामना गमवावा लागला होता. जर चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बुमराह फिट झाला नाहीतर टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.