बंदुकीचा धाक दाखवत ५० लाखांचा ऐवज लुटला

पुणे: सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्यांच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील एका प्रसिद्ध सोने व्यापारी दुकानावर सायबर हल्ल्याची घटना समोर येऊन काही तास झाले असताना, आणखी एक जबरी चोरीचा पारकर उघडकीस आला आहे.

नगर रोडवरील सोन्याच्या तारणावर कर्ज देणाऱ्या गोल्ड लोनच्या कार्यालयावर एका चोरट्याने पिस्तुलाचा धाक दाखवून ५० लाख रुपयांचा ऐवज लुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मागील पंधरा दिवसांत शास्राच्या धाकाने सोने लुटण्याची हि दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

या घटनेबद्दल अधिक माहिती अशी, चंदननगर येथील भाजी मार्केटजवळ आनंद इम्पायर इमारतीच्या तळमजल्यावर आयआयएफएल गोल्ड लोनचे कार्यालय आहे़. हे कार्यालय सकाळी दहा वाजता उघडल्यानंतर दोन महिला व एक पुरुष कर्मचारी कार्यालयात बसले होते़. सोने तारण ठेवण्याच्या बहाण्याने साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जण कार्यालयात आले़. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवला़ त्यांच्यातील एक जण बाहेर उभा राहिला होता़. दोघांनी कर्मचाऱ्यांना पिस्तुल दाखवून सोने बॅगेत भरले व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जवळपास ५० लाखांचा ऐवज लुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पुढील तपस पोलीस करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)