3 लाख 26 हजार रुपायांची गोवा बनावटीची दारु जप्त

उत्पादन शुल्क विभागाचा छापा

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने चंदगड तालुक्यातील हेरे येथे अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेल्या मद्य साठ्यावर रविवारी छापा घातला असून. या छाप्यात 3 लाख 26 हजार 640 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अवैध दारु जप्त करण्यासाठी भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी अवैध मद्य विक्री, वाहतूक, साठा अशा ठिकाणी आणि सीमावर्ती भागात अवैद्य व्यावसायिकांवर या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील हेरे येथील राजेंद्र गवस यांच्या घरी अवैद्यरित्या विक्री करण्यासाठी गोवा बनावटीचा मद्य साठा असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकला असता, घरालगताच्या अडगळीच्या खोलीत प्लॅस्टीक ताडपद्रीच्या खाली गोवा बनावटीचा विविध ब्रँडचा विदेशी मद्य साठा आढळून आला. अवैध रित्या मद्यसाठा केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हायवर्डस फाईन व्हिस्की, मॅकडॉल नं.1, गोल्डन एस.ब्ल्यू व्हिस्की, इम्पोरियल ब्ल्यू व्हिस्की, टुबर्ग बिअर या ब्रँडच्या 750 व 180 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले 58 बॉक्स आढळून आले आहेत. भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जनन्नाथ पाटील,किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे यांनी हि कारवाई केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)