अमेरिकेत रेल्वे रुळावरुन घसरून 3 ठार

वॉशिंग्टन – अमेरिकेतील उत्तर-मध्य मॉन्टाना मध्ये सिएटल आणि शिकागो दरम्यान एमट्रॅक रेल्वे रुळावरून घसरल्याने किमान तीन जण ठार झाले. रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे रेल्वेचे डबे एकाबाजूला कलंडले, असे एमट्रॅक रेल्वेच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले. शिकागो आणि सिएटलदरम्यानच्या जोपलीन इथे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे रुळावरून घसरली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुळावरून रेल्वे घसरून झालेल्या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला, असे लिबर्टी काउंटी शेरीफचे डिस्पॅचर स्टार टायलर यांनी सांगितले. या ट्रेनमध्ये सुमारे 141 प्रवासी आणि 16 कर्मचारी होते, असे एमट्रॅकच्या प्रवक्त्‌याने सांगितले. ट्रेनमध्ये दोन लोकोमोटिव्ह इंजिन आणि 10 कार होत्या, त्यापैकी आठ रुळावरून घसरल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.