पुणे : देशात एकीकडे केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलने आणि निदर्शने होत आहेत. तर दुसरीकडे कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहेत. दरम्यान सुधारित नागरिकत्व कायद्याला आज अशाच पद्धतीने पुण्यात पाठिंबा देण्यात आले.
केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए कायद्याच्या स्वागत आणि समर्थनार्थ पुणे महानगर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ३०० फुट तिरंगा पदयात्रा काढली. ही पदयात्रा मॉर्डन महाविद्यालय गणेश खिंड ते शिवाजीनगर मॉर्डन महाविद्यालय पर्यंत काढण्यात आली. दरम्यान, या पदयात्रेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.