कराड – तासगाव रस्त्यावरील शेणोली येथील पोल्ट्रीजवळ पहाटे व्यायामास गेलेल्या तिघांना भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने चिरडले. या अपघातात तिघेही जागीच ठार झाले, तर एक जण बचावला. आज सोमवारी पहाटे ही घटना घडली.
या अपघातामध्ये दीप ज्ञानू गायकवाड (वय ४५), प्रवीण हिंदुराव गायकवाड (वय ४०) आणि विशाल धोंडिराम गायकवाड ( वय ३०, तिघे रा. सम्राटनगर, शेणोली, ता. कराड) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती. कराड तालुक्याचे पोलिसही त्या ठिकाणी पोहचले.