पुणे – पुणे वनविभागाने पूर्णानगर पिंपरी चिंचवड येथून तीन किलो व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली. त्याचबरोबर एक मारोती कार आणि मुद्दे मालासह सहा आरोपींना अटक केली आहे. सदर कार्यवाही पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मयूर बोठे प्रदीप संकपाळ यांनी केली.
व्हेल माशाची उलटीची एक किलोची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते.
अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.