मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये आज मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने कारवाई करत परदेशी चलन जप्त केले आहे. मुंबईतील माहीम येथून एका टॅक्सीतून ३ कोटी रुपये मूल्याचे विदेशी चलन जप्त केले आहे.
Maharashtra: A team of Election Commission has seized foreign currencies of multiple countries from 2 people in Mahim area of Mumbai. Total value of the seized foreign currency is Rs 3 Crore. Further action is being taken.
— ANI (@ANI) April 11, 2019
टॅक्सीमधून जाणाऱ्या दोन व्यक्तींकडून विविध देशांचे परकीय चलन जप्त केले असून, भारतीय चलनानुसार त्यांची ३ कोटी रुपये मूल्य असल्याची माहिती पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.